अनेक आजारांचं मूळ पोटात असतं. म्हणजेच पोट साफ न होणं अनेक आजारांना आमंत्रण देतं. पित्त, गॅसेस, ढेकर, जळजळ अशा समस्या उद्भवतात, तसंच अपचनही होऊ शकतं. पोट साफ न होण्यासाठी चुकीच्या आहारपद्धती, पुरेसं पाणी न पिणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर शौचाला न जाणं, चहा-कॉफीचं अतिरेकी सेवन व धूम्रपान या सवयी कारणीभूत असतात. नियमित पोट साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थ वाटतं व दिवस खराब जातो.
पोट साफ होत नसेल, तर अनेक लक्षणं दिसू लागतात. त्यात सुरुवातीला गॅसेस व नंतर मलावरोध होऊ लागतो. पोट फुगणं, पोटात दुखणं ही याची मुख्य लक्षणं आहेत.
गॅसेस होणं
भूक मंदावणं
सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी प्यायलं, तर पोट साफ होऊ लागेल. हा उपाय नियमित केल्यास ही तक्रार कायमची बंद होईल. यासोबतच दिवसभरही पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे. जेवल्यावर लगेचच पाणी पिऊ नये, त्यामुळे गॅसेस, मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. यामुळेच अपचन व इतर आजारही निर्माण होतात.
पोटाच्या समस्यांवर हिंग खूप प्रभावशाली आहे. कोमट पाण्यात थोडं हिंग घालून ते पाणी प्यायल्यास पोट साफ होतं.
आयुर्वेदात वमन विधीबाबत बरंच सांगितलेलं आहे. पोट साफ होण्यासाठीचा हा प्रभावशाली उपाय आहे. रोज सकाळी उठल्यावर पोटभर पाणी प्या. काही मिनिटांनी घशात बोटं घालून उलटी काढा. यालाच वमन म्हणतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीचा हा चांगला उपाय आहे. मात्र लहान मुलांवर याचा प्रयोग शक्यतो करू नये. तसंच पहिल्यांदा वमन करणाऱ्यांनी कोणा तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनानं हा प्रयोग करावा.
असे काही छोटे छोटे कारण असतात की ज्यामुळे आपल सगळ शरीर बिघडत असतं त्यामुळं पोट साफ होणं आवश्यक असते.
إرسال تعليق