सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने घरातील गॅस सिलेंडरची सबसिडी एक वर्षांसाठी वाढवली जाईल अशी घोषणा करण्यात आली असून लवकरच या निर्णयामुळे राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळनार आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत जो गॅस सिलेंडर दिला जातो त्या सिलेंडर साठी एका वर्षासाठी प्रत्येकी २००रुपये एवढे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे आता या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला थोडाफार दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.कारण या घोषणेमुळे एल पी जी गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती वापरातील गॅस सिलेंडर ची किंमत काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
या निर्णयामुळे १.६ कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ घेता येईल. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत एका वर्षासाठी १२गॅस सिलेंडर देण्यात येतात म्हणजे एका गॅस सिलेंडर टाकी साठी २०० रुपये अनुदान म्हणजे असे एकूण १२ टाक्यांसाठी एकूण २४०० रुपये अनुदान मिळेल.
नक्किच हा निर्णय सर्वसामन्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांना फायद्याचा ठरेल.

Post a Comment