सध्या सर्वत्र कमी अधिक प्रमाणात कोरोनाचा कहर चालू आहे मात्र राज्यभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे.

मागील 24 तासांत राज्यभर कोरोनाचे 14 हजार 372 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 94 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तर याच 24 तासांत 30 हजार 93 रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त व्यवस्थितपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

आणि विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत राज्यात एकही नव्या ओमायक्रोन रुग्ण सापडला नाही. राज्यातील एकूण 3221 ओमायक्रोन रुग्णांपैकी 1682 ओमायक्रोन मुक्त झाले आहेत.

तर 24 तासांत एकूण 94 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.राज्यात कोरोनाचा मृत्यू दर 1.84 झाला असून आत्ता पर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्ण कोरोनातून  मुक्त देखील झाले आहेत.

राज्यातील एकूणच कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.63 असून राज्यात सध्या 10 लाख 69 हजार 596 रुग्ण होम क्वारंटाइन असून सरकारी रुग्णालयांत एकूण 2731 रुग्ण क्वारंटाइन आहेत.

राज्यात आत्ता पर्यंत एकूण 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 पेक्षा अधिक प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे वाढत्या तापमानानुसार या रुग्ण संख्येत कमी अधिक प्रमाणात चढ उतार होताना दिसून येत आहे.

मात्र पहिल्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होताना दिसत आहेत. त्यामुळे ही एक दिलासादायक बातमी आहे.

Post a Comment