यामुळे करतात साजरा जागतिक कर्करोग दिन:

दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी WCA(WORD CANCER DAY)अर्थात जागतिक कर्करोग दिन जगभर साजरा करण्यात येतो.


कर्करोग कोणत्या कारणांमुळे होतो, आणि त्याची लक्षणे कोणती ? आणि त्यापासून आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कर्करोगापासून आपण कशा प्रकारे सावध राहिले पाहिजे. 

तसेच तो होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारच्या विशेष योजना आखल्या पाहिजेत या सर्व गोष्टींपासून सर्वसामान्य ते सर्वच स्तरांतील लोकांची जनजागृती करण्यासाठी पॅरिस येथे एका जागतिक परिषदेत सन 2000 साली जागतिक कर्करोग दिन ही संकल्पना मांडण्यात आली होती.

काही साध्या आणि सरळ गोष्टी करून आपण कर्करोगापासून सहज रित्या आपले आरोग्य सुरक्षीत ठेऊ शकतो.यासाठी आपण नियमित व्यायाम करणे, योगासने आणि काही महत्त्वाची प्राणायाम करणे, योग्य आहार घेणे, आणि हिरव्या पालेभाज्या आणि आरोग्यास पोषक असा सकस आणि पौष्टीक आहार घेणे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे.कारण कर्करोगाला आमंत्रण देणारे मुख्य कारण म्हणजे व्यसनच असतात. त्यामुळे नेहमी निर्व्यसनी राहील पाहिजे.

नेहमी स्वच्छता पाळणे, अशा प्रकारे आपण अगदी सहज आणि योग्य प्रकारे काळजी घेऊन कर्करोगापासून स्वतःला आणि एखाद्या कर्करोग झालेल्या लोकांना देखील वाचवू शकतो. 

Post a Comment