व्हाट्सऍप ट्रिक्स: एकाचवेळी पाठवा अनेकांना मेसेजेस, जाणून घ्या सविस्तर:
आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात/जगात मोबाईल वापरणारा नाही असा व्यक्ती सापडणे कठीण आहे. पण बदलत्या काळानुसार माणूसही इतका प्रगतशील झाला आहे, की रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्याचा त्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे.
त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण वापरत असलेला स्मार्ट फोन होय. आजकाल अनेकजण किंवा बहुतेक जण अतिशय महागडे स्मार्ट फोन वापरत असतात.
आणि स्मार्टफोन म्हंटल की त्यात सोसिएल मीडिया आलाच जसे की इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍप, ही सर्वाधिक वापरली जाणारी लोकप्रिय मीडिया ऍप्लिकेशन्स, त्यापैकीच एक लोकप्रिय ऍप्लिकेशन म्हणजे व्हाट्सऍप होय.
आपल्याला जेव्हा एखाद्याला शुभेच्छा संदेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा, किंवा सन ,उत्सव यांसारख्या अनेक कामासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण व्हाट्सऍप या सोसिएल मीडिया ऍप्लिकेशन चा वापर करतो.
मात्र त्यावेळी हे संदेश/मेसेजेस पाठवताना आपण केवळ एका वेळी किमान १आणि कमाल ५ व्यकींनाच हे मेसेजेस/संदेश पाठवू शकतो. आणि यावेळी आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये भरपूर कॉन्टॅक्टस असतील तर या सर्वांना मेसेजेस पाठवताना आपला खूप वेळ जातो.
मात्र हाच वेळ वाचावला आणि केवळ एकच मेसेजेस/संदेश एकाच वेळी ५ पेक्षाही अधिक जणांना पाठवता आला तर किती बरं होईल. चला तर जाणून घेऊया व्हाट्सऍप च्या या जबरदस्त ट्रिक विषयी.
ही ट्रिक्स आपल्या व्हाट्सऍप वर वापरण्यासाठी सर्व प्रथम आपलं व्हाट्सऍप उघडा, नंतर वरती उजव्या बाजूला तीन डॉट्स(टीम्भ)वर क्लीक करा.
तेथे काही ऑप्शन्स दिसतात, त्यांपैकी एक new broadcast वर क्लिक करून नंतर आपल्याला आपल्या व्हाट्सऍपवर जे कॉन्टॅक्ट आहेत ते दिसतील यांपैकी तुम्हांला जे निवडायचे/सिलेक्ट करायचे आहेत ते सर्व सिलेक्ट करा. एकावेळी कमीतकमी १आणि जास्तीतजास्त २५० कॉन्टॅक्टस आपण निवडू शकतो.
आता या निवडलेल्या सर्व कॉन्टॅक्टस ला सेव्ह/save करून या लिस्ट ला हवे ते नाव देऊ किंवा प्रोफाइल फोटो लावू शकता. गरजेनुसार यात बदलही करता येतात.
ही व्हाट्सऍप ट्रिक आपल्याला नक्कीच आवडेल. एकदा अवश्य try करा आणि इतरांनाही ही ट्रिक share करा.
إرسال تعليق