आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात अनेकजण मोबाईल वापरतो आणि अनेक वेळा आपण हे देखील ऐकत असतो की या या ठिकाणी मोबाईल द्वारे आर्थिक फसवणूक वगैर वगैरे.
तर कशी केली जाते ही फसवणूक याचा सविस्तर आढावा:
अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी सर्व प्रथम चोरटे हे आपले सिमकार्ड क्लोनिंग करतात. तर सिमकार्ड क्लोनिंग केले जाते तेही आपल्याच चुकीमुळे.
या प्रकारे केले जाते सिमकार्ड क्लोनिंग:
● आजकाल बहुसंख्य लोक हे पैशाचे व्यवहार हे मोबाईल मध्येच करतात.
● एखाद्याला ऑनलाईन पैसे पाठवणे. किंवा एखाद्या अन्य व्यक्ती कडून पैसे आपल्या बँक खात्यात जमा करणे.
● आणि जर ऑनलाईन व्यवहार करायचे असतील तर यासाठी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक हा आपल्याबँक खात्याशी जोडावा लागतो.
● आणि ऑनलाईन चोरटे खोटे सिमकार्ड बनवून आपलं सिमकार्ड क्लोनिंग करतात.
●त्यामुळे आपल्याला अनेकवेळा फोन, कॉल्स येतात, आणि समोरची खोटी व्यक्ती आपली खरी ओळख पटवून देण्यासाठी शुद्ध हिंदी किंवा इंग्रजी वा इतर भाषेचा वापर करतात.
● जेणेकरून ग्राहकाला वाटते की ती व्यक्ती खर बोलत आहे.
● आणि आपल्या सिमकार्ड वा बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
●अशावेळी कधी कधी खुप सुशिकक्षीत लोक देखील या प्रकारच्या फसवणुकांना बळी पडून कधी कधी मोठ्या प्रमाणात स्वतःचेच आर्थिक नुकसान करून घेतात.
तर आपल्या सोबत हा प्रकार घडू नये म्हणुन आपण काही काळजी घेणे आवश्यक असते.
जर या ऑनलाईन चोरट्यांपासून वाचायचे असेल तर अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
● सिमकार्ड संबंधी महत्त्वाचे पिन्स किंवा पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नये.
● जर एखाद्यावेळी मोबाईलच्या सिमकार्ड चे नेटवर्क खराब झाले असेल किंवा काम करत नसेल तर, अशावेळी नेटवर्क ऑपरेटर ची मदत घेतली पाहिजे.
● आपल्याच नावावर किंवा त्याच नंबर्स चे खोटे सिमकार्ड तर इतर कोणी वापरत नाही ना याची खात्री करा. आणि काळजी घ्यावी.
●आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी अनोळखी नंबर्स द्वारे तुम्हाला कॉल्स, मेसेजेस येतील आणि त्यावेळी काही गोष्टींची विचारणा केल्यास किंवा माहिती मागितल्यास कधीही माहिती देऊ नये.
● आणि विशेष म्हणजे ज्यावेळी अनोळखी नंबर्स द्वारे कॉल्स येईल त्यावेळी त्या व्यक्तीशी जास्त वेळ न बोलता लगेच संपर्क/कॉल्स कट करावा.
अशाप्रकारे आपण ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या नुकसानापासून वाचवायचे असेल तर अशा प्रकारच्या मोजक्याच आणि शुल्लक माञ अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केले तर भविष्यात होणाऱ्या खुप मोठ्या आर्थिक नुकसानी पासून वाचू शकतो.
إرسال تعليق