म्हाडाच्या परीक्षा वेळापत्रकात आणखी एकदा बदल झाला असून या परीक्षा आता 31 जानेवारी ते 2,3,7,8,9 या सहा दिवसांत ही परीक्षा होणार आहे.
एकूण 565 पदांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा ऑफ लाइन ऐवजी आता ऑनलाईन घेतली जाणार आहे.विविध परीक्षांचा अनुभव असणाऱ्या टी सि एस या कंपनीकडे म्हाडाच्या परीक्षेचे नियोजन आहे.
जि ए सॉफ्टवेअर या कंपनीच्या अधिकाऱ्याने गोपणीयतेचा भंग करत पेपर फोडल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे ही परीक्षा तात्काळ रद्द करण्यात आली होती. मात्र आता ही परीक्षा टी सी एस या कंपनीकडे देण्यात आली आहे.
या प्रकारची सर्व माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
إرسال تعليق