क्रिकेटचे चे चाहते जगभर असून दिवसें दिवस हा लोकांचा आवडता खेळ होत चालला आहे. क्रिकेट म्हंटल की क्रिकेट प्रेमींचा एक प्रकारचा उत्साहच असतो.
आणि त्यात म्हणजे भारतात दरवर्षी होणारी indian premiere league अर्थात IPL हा तर एखाद्या सनाप्रमाणेच साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी IPL खेळवले जाणार आहे.
या दिवशी होईल IPL 2022 ची सुरुवात, जाणून घ्या पूर्ण माहिती:
संपूर्ण देशभरात कोरोनाची तिसरी लाट चालू आहे, मात्र तरीही यावर्षाचा IPL हंगाम हा होणार असून विशेष म्हणजे तो यंदा पूर्वीप्रमाणे भारतातच होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रेक्षकांना मैदानावर येण्यास मनाई करण्यात येऊ शकते.
यंदाचा IPL हंगाम हा 27 मार्चपासून मुंबईतूनच सुरु होईल अशी माहिती BCCI चे सचिव जय शहा यांनी दिली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे IPL चे निम्याहून अधिक सामने दुबई मध्ये सर्व संघांना तेथे नेऊन हे सामने पार पाडण्यात आले होते.
मात्र यावर्षीचा IPL चा हंगाम 15 वा हंगाम असून तो नेहमीप्रमाणे भारतातच पार पडणार आहे असा निर्णय BCCI ने घेतला आहे. या वर्षी 27 मार्चपासून IPL ला सुरुवात होत असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे.
IPL चा हा 15 वा हंगाम आहे.मात्र यावर्षी आणखी नव्या 2 संघांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु जर कोरोना आणखी वाढला तर IPL दक्षिण आफ्रिका येथे होऊ शकते अशी देखील माहिती देण्यात येत आहे.
إرسال تعليق