ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यावर्षीच्या T20 क्रिकेट चे वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये भारत,पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, सह सुपर 12 मध्ये आहेत.
तर नामीबिया,श्रीलंका,वेस्ट इंडीज, सह स्कॉटलंड चे 4 संघ 16 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी आमने सामने असतील. यांपैकी जे दोन संघ निवडले जातील त्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात येणार आहे.
तर यांपैकी भारत आणि पाकिस्तान यांचा सामना हा 23 ऑक्टोबर रोजी होणार असून,या T20 विश्वचषकाचे सामने हे 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर महिन्यांत खेळले जाणार आहेत.
ऍडलेड,ब्रिस्बेन, पर्थ,जिलॉंग, सिडनी,हॉबर्ट, ऑस्ट्रेलियातील या प्रमुख शहरातील क्रिकेट मैदानावर या T20 क्रिकेट चे सामने होणार असून यातील शेवटचा सामना हा 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर खेळावला जाणार आहे.
तर उपांत्य फेरीतील सामने हे सिडनी आणि ऍडलेड ओहल येथील मैदानावर खेळवले जाणार आहेत.तर या सामान्यांसाठी होणाऱ्या तिकिटांची विक्री 7 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. आणि विशेष म्हणजे या वेळी यावेळी देखील कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे देखील व्यवस्थित पालन करावे लागणार आहे.
एकूणच हा T20 विश्वचषक स्पर्धेचा 8 वा हंगाम असेल.
إرسال تعليق