कधी कधी आपण बोलताना आपल्या मित्रांना किंवा जवळच्या इतर व्यक्तींना सहज किंवा कधी रागाने बोलतो की तुझी बत्तीशी घशात घालीन.

मात्र खरंच मानवामध्ये ३२ च दात असतात का असा प्रश्न कधी कोणाला पडतो का ? आणि ज्यांना वाटते की मानवी मुखात केवळ ३२ च दात असतात ते सर्व चुकीचे ज्ञान जाणत आहेत.

चला तर सविस्तर जाणून घेऊ की, मानवी मुखात एकूण किती दात येतात ?

सर्वप्रथम दातांच्या अभ्यासाला ओडोंटोलॉजि (odontology) असे म्हणतात हे लक्षात राहू द्या. सुरुवातीला ज्यावेळी बालक ६ ते ८ महिन्यांचे होते त्यावेळी दुधाचे दात यायला सुरुवात होते.

दुधाचे दात एकदा पडून पुन्हा एकदा येतात. असे दुधाचे एकूण दोन्ही वेळेचे मिळून एकूण २० दात येतात. वयाच्या २ ते अडीच वर्षापर्यंत हे दूधाचे दात पूर्ण होतात. 

ज्यावेळी कायमचे दात म्हणजेच (permanent teeth) यायला सुरुवात होते, तसे तसे हे दूधाचे दात पडायला सुरुवात होते.मात्र दातांच्या सर्व प्रकारांपैकी (Molar teeths) म्हणजेच दाढा या  एकदाच येतात.

पहिली दाढ ही वयाच्या ६ व्या वर्षापासून येण्यास सुरुवात होते. तर म्हणजेच एकूनचं म्हणजे दूधाचे २० दात अधिक कायमस्वरूपी येणारे दात आणि दाढा या मिळून ३२ दात . म्हणजेच मानवी मुखामध्ये ३२ नाही तर एकूण ५२ दात येत असतात.

तर आता मानवी मुखात एकूण दातांची संख्या किती ? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. की


मानवी मुखात एकूण ५२ दात येतात.

Post a Comment