क्रिकेट म्हंटल की क्रिकेट प्रेमींची कमी नाही जगभरात इतर खेळांप्रमाणे क्रिकेट हा देखील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.

आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा खेळ खूप आदराने आणि एकदम उत्साहाने पाहिला जातो. त्याच क्रिकेट प्रेमीं साठी एक महत्वाची बातमी आहे.ती अशी की,

भारत दक्षिण आफ्रिका च्या दौऱ्यावर असून या दोन देशांत काही दिवसांपासून क्रिकेट चे सामने चालू असून तीन कसोटी सामने पार पडले आहेत.आता एकदिवसीय सामने खेळले जाणार असून यातील पहिला सामना आज दुपारी 2 वाजता सुरू होईल.

या दोन्ही देशांत आता पर्यंत 84 सामने खेळले गेले असून टीम इंडिया ने 35 तर दक्षिण आफ्रिकेने 46 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापत ग्रस्त असुन त्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी धडाडीचा फलंदाज लोकेश राहुल कडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात के. एल. राहुल आणि टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी किती मेहनत घेते पाहायला मिळेल.

तसेच टीम इंडिया संघाचा कर्णधार के. एल. राहुल या एकदिवसीय सामन्यासाठी  आणखी कोणत्या नव्या खेळाडूला संधी देईल का हे देखील पाहायला मिळेल.

Post a Comment