महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या महान संत, संत श्री भगवान बाबांची आज पुण्यतिथी असून दरवर्षी ही एखाद्या उत्साहाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
पाथर्डी शहरापासून ३० किमी पूर्व दिशेला असणाऱ्या भगवानगड या धार्मिक ठिकाणी आणि भगवान बाबांच्या जन्मगावी ही पुण्यतिथी एखाद्या उत्साहाप्रमाणे साजरी केली जाते.
भगवान बाबां विषयी जाणून घेऊ सविस्तर:
भगवान बाबांचे मूळ नाव:आबाजी तुबाजीराव सानप जन्म-इ.स.२९ जुलै १८९६,मृत्यू-१८ जानेवारी १९६५ भगवान बाबा वारकरी संप्रदायातील अग्रगण्य संत होते.
मूळ नाव: आबाजी तुबाजीराव सानप
जन्म: २९ जुलै १८९६
जन्म ठिकाण: महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव
मृत्यू/ निर्वाण
१८ जानेवारी १९६५ वयाच्या ६८ व्या वर्षी पुणे येथिल रुबी हॉल क्लिनिक
बाबांचे गुरु: संत एकनाथ
संत तुकाराम
माणिकबाबा
गीतेबाबा दिघुळकर
आणि बंकटस्वामी
बाबांचे शिष्य : भीमसिंह महाराज
संबंधित क्षेत्र : भगवान गड
(पूर्वीचे नाव धौम्य गड)
राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तने आणि अभंग प्रवचनाच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील गरीब आणि अज्ञानी लोकांसाठी आपले आयुष्य खर्ची केले. अंधकारात खितपत पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आणि कष्टकरी जनतेला भक्तीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवुन त्यांच्या जीवनात असलेला अंधकार आणि अडाणीपणा दूर केला.
आपल्या कीर्तनातून आणि अभंगातून त्यांनी जातीभेद, धर्मभेद, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा रुडी आणि परंपरा यांचे खंडन केले. या कामासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या भागात देखिल प्राचारकार्य करण्यासाठी हा प्रदेश धुंडाळून काढत तेथील अज्ञानी आणि अडाणी जनतेला विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवत ज्ञान दानाचा उपदेश केला.
भगवान बाबा हे वंजारी समाजाचे मुख्य श्रद्धा स्थान असून त्यांचाच आदर्श घेऊन आणि प्रेरणा घेऊन आजही त्यांचे उत्तराधिकारी समाजकार्य करत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरापासून ३० किमी. पूर्वेकडे अप्रतिम आणि संपूर्णपणे निसर्ग रम्य वातावरणात भगवानगड हे पवित्र आणि धार्मिक स्थळ असून येथेच राष्ट्रसंत भगवान बाबांची समाधी आहे.विविध ठिकाणाहून भाविक या ठिकाणी येत असतात.
दरवर्षी दसरा आणि भगवान बाबांच्या पुण्यतिथीला येथे मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो.एकवेळ अवश्य भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे.
إرسال تعليق