आपण दरवर्षी अनेक वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करतो. त्यापैकीच एक सण उत्सव म्हणजे मकर संक्रांती जो संपुर्ण भारतभर साजरा केला जातो.
मकर संक्रांत हा सण भारतीय पौष महिना म्हणजे इंग्रजीतील जानेवारी महिन्यात येतो. संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा असा हा सण आहे. जो की कालगणनेशी देखील संबंधीत आहे.
तसेच भारतात कृषिप्रधान संस्कृती असल्यामुळे अनेक पिके फळे यांना बहर आलेला असतो. आणि याच पिकांच्या वाणांची किंवा फळांची देवाण घेवाण यादिवशी केली जाते. उदा. गव्हाच्या ओंब्या, हरभरा, बोरे, ज्वारीची कणसे, या सर्व गोष्टी एकत्र करून देवाला अर्पण करण्यात येतात.
तसेच यामागे काही भौगोलिक संदर्भ असा आहे की,
प्रत्येक वर्षी २१-२२ डिसेंबर या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीच्या दक्षिण अक्षांसावर पडल्यामुळे त्यादिवसापासून पृथ्वीचे उत्तरायण चालू होते. इ.स. च्या पहिल्या वर्षात सूर्याचा नेमका मकर राशीत प्रवेश होत असे, त्यामुळे दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणण्याचा प्रघात पडला.
आणि पुढच्या काळात देखील सूर्याची उत्तरायनाची सुरुवात देखील २१-२२डिसेंबरमध्ये होत राहिल्यामुळे साहजिकच मकरसंक्रमनाची तारीख देखील पुढे पुढे जाऊ लागल्यामुळे आपला सण म्हणजे मकरसंक्रांतीच्या तारखेत देखील बदल होत गेला.
या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. २१-२२डिसेंबर नंतर सुर्य उत्तरेकडुन उगवताना दिसतो. कारण २१-२२डिसेंबर नंतर सूर्याचे उत्तरायण चालू झालेले असते.
संक्रांतीला भारत वर्षात एखाद्या देवतेप्रमाणे मानले जाते त्यामुळे ही देवता दर वर्षी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते कधी तिचे वाहन डुक्कर, तर कधी गाढव, तर कधी, हत्ती असे असते. अशी एक धारण किंवा समजूत आहे.
विशेषतः महाराष्ट्रात हा सण साधारण तीन दिवस साजरा केला जातो. यादिवशी सर्वजण आपल्या नातेवाइकांना, मित्र मंडळ आणि सर्व परिवाराला तिळगुळ घेऊन आणि देऊन तसेच वडीलधाऱ्या आणि मोठ्यांप्रति आदराची भावना निर्माण होण्यासाठी त्यांच्या चरणांना स्पर्श करून आदर व्यक्त करत "तीळगूळ घ्या गोड गोड बोला" या वाक्याचा उच्चार केला जातो.
थंडीच्या दिवसात तिळला फार महत्त्व असल्याने या काळात जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात तिळाचा वापर केला जातो.तिळातील स्निग्धता आणि गुळातील गोडवा यातून स्नेहपूर्ण मैत्रीचा हेतू दर्शवला जातो.
तसे पाहता हा सण संपूर्ण भारतभर विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरा केला जातो. जसे की,
● उत्तर भारतात
• हिमाचल प्रदेश मध्ये : लोहळी किंवा लोहडी
• पंजाब मध्ये देखील: लोहळी किंवा लोहडीच
● पूर्व भारतामध्ये
• ओरिसा: मकर संक्रांती
• पश्चिम बंगाल: मकर संक्रांती
• बिहार: संक्रांत, खिचडी
•आसाम: भोगाली बहू
● पश्चिम भारतात
• राजस्थान आणि गुजरात मध्ये हाच सण उतराण म्हणुन ओळखला जातो.
● तसेच दक्षिण भारतात
•तामिळनाडू मध्ये: पोंगल
आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मध्ये: संक्रांती असे म्हंटले जाते.
असा हा सण संपूर्ण भारतभर तसेच इतर विदेशी देशात देखील विविध नावाने साजरा केला जातो.
नेपाळमध्ये: माघी किंवा माघ संक्रांती
म्यानमार मध्ये: थिंगयान
अशा प्रकारे हा सण अनेक ठिकाणी अनेक प्रकारे साजरा केला जातो.
إرسال تعليق