वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भ तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका खूप वाढणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आणि त्याच बरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पासून पण पडणार आहे असा अंदाज/आणि इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई येथील प्रादेशिक हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, परभणी,जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, नांदेड, इत्यादी ठिकाणी थंडीची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.

आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस होईल असा देखील अंदाज सांगण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र थंडीचा कडाका कमी होईल असे देखील सांगण्यात येत आहे.

मात्र वातावरणातील विविध बदलामुळे हा बदल होत असून त्यामुळे रोजच्या तापमान आणि थंडीत देखील बदल होत आहे. यावेळी या कडाक्याच्या थंडीपासून रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग्य प्रकारे काळजी देखील घेतली पाहिजे.

Post a Comment