महाराष्ट्र आणि मराठी भाषा म्हंटल की आपल्याला लगेच काही नेते मंडळी किंवा एखादा राजकीय पक्ष जसे की म. न.से. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या पक्षाचे निर्माते माननीय राज ठाकरे साहेब आठवतात.
खरंच आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय पक्ष म्हणजे म. न. से. याचे निर्माते मा. राज ठाकरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांनी मराठी माणूस आणि मराठी अस्मिता जपण्याचे जे काम हाती घेतले आहे. ते अगदी तोंड भरून कौतुक करण्यासारखे आहे.
महाराष्ट्रात जेव्हा केव्हा मराठी माणूस किंवा मराठी भाषेवर संकट येते तेव्हा तिचे रक्षण करण्यासाठी आणि मराठी अस्मिता जपवण्यासाठी म. न. से. कार्य कर्ते नेहमी तत्पर असतात. मराठी भाषा वापरण्यासंदर्भात या पक्षाकडून वेळोवेळी आवाज देखील उठवले जातात.
आणि कदाचित याचाच एक भाग म्हणून मराठी भाषासंबंधी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो असा की दुकानांसमोरील पाट्या या मराठीत असण्या संदर्भात हा नियम आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना २०१७ लागू होत असल्याने मात्र तरीही दहा पेक्षा कमी कामगार असणाऱ्या आस्थापना किंवा दुकाने या नियमांचे पालन करत नाहीत.अशा तक्रारी सरकारकडे करण्यात आल्यामुळे त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती.
त्यामुळे राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मराठी भाषासंबंधी मंत्रालयात बैठक घेऊन कायदा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने दुकाने आस्थापना (नोकरीचे व विनियमने)अधिनियम २०१७ या कायद्यात सुधारणा करून या पासून पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता लहान दुकानासमोरील पाट्या देखील मराठी भाषेत कराव्या लागणार आहेत. बहुसंख्य दुकाने आणि अनेक व्यापारी पेढ्यांत दहा पेक्षा कमी कामगार असतात. ही गोष्ट लक्षात घेता आता रस्त्याकडील सर्व दुकानांतील पाट्या या मराठीत लागलेल्या असतील.
विशेष म्हणजे मराठी-देवनागरीतील अक्षरे इंग्रजी किंवा अन्य भाषेपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत. या संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूणच विचार करता हा निर्णय मराठी भाषा आणि तिच्या अस्मितेसाठी महत्वाचा आणि कौतुकास्पद आहे.
إرسال تعليق