गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ चालू असताना सर्व क्षेत्रांतील भरती प्रक्रिया वारंवार लांबवण्यात आल्या होत्या आणि काही टप्प्या टप्प्याने घेण्यात आल्या तर काही अजून चालू आहेत.
आता राज्यात परत एकदा नव्याने 7200 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.ग्रहमंत्र्यांच्या माहितीनुसार राज्यात 5200 पोलीस पदांचे पेपर, ग्राउंड आणि निकाल व्यवस्थित पार पडले असून
आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 7200 पोलीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
إرسال تعليق