आता यू आय डी ए आय ने आधार संबंधित महत्वाचा निर्णय घेतला आहे.प्राधिकरणाने यासाठी आधार सेवा केंद्र या परियोजनेची तयारी केली आहे.
आधार सेवा केंद्र या परियोजने अंतर्गत सुरुवातीला देशातील 53 शहरांतील 114 ठिकाणी आधार सेवा केंद्र बनवण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे.
या केंद्रात आधार अपडेट्स सह आधार कार्ड शी संबंधित सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात देशातील एकूण प्रमुख 53 शहरे,राज्ये,आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात येणार आहे.
आतापर्यंत देशात एकूण 35 हजार आधार केंद्रे चालू असून बँक, पोस्ट ऑफिस, आणि बी एस एन एल च्या कार्यालयांत कार्यरत आहेत.
आधार कार्ड च्या काही सेवा मोफत मिळणार आहेत. तर 5 ते 15वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे फ्री असणार आहे.
तर 15 वर्षे वरील वयोगटातील व्यक्तींसाठी 100 रुपये तर वैयक्तिक अपडेट्स करण्यासाठी 50 रुपये आणि आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आणि कलर प्रिंट काढण्यासाठी 30 रुपये द्यावे लागणार आहेत.
ही सेवा आठवड्यातील सातही दिवस पुरवली जाणार असून सकाळी साडे नऊ ते रात्री साडे पाच पर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे.या केंद्रात एसी तसेच दिव्यांग नागरिकांसाठी व्हील चेअर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच या केंद्रात आधार कार्ड बनवणे, कलरप्रिंट काढणे, आधार अपडेट्स करणे, आधार डाउनलोड करणे इत्यादी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच याठिकाणी जाऊन कोणताही भारतीय नागरिक आपले नाव, फोन नंबर्स, ई-मेल आयडी, फोटो,तसेच फिंगरप्रिंट, पत्ता,इत्यादी गोष्टींचा बदल किंवा अपडेट्स करू शकतो, तेही एकाच ठिकाणी.
तसेच या परियोनेद्वारे ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून एक व्यक्ती एका महिन्यात 4 वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.
अशा प्रकारे ही योजना राबविण्यात येणार आहे.
إرسال تعليق