अहमदनगर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज रात्रीपासून जिल्ह्यात जे निर्बंध लागले आहेत. ते खालील प्रमाणे असतील.
• पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंदी राहील.
• अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरु राहतील.
• बाहेर पडताना मास्क चा वापर करणे अत्यावश्यक असेल.
• गर्दीची ठिकाणे जसे की प्रार्थना स्थळे, धार्मिक स्थळे, मॉल्स, जिम्स इत्यादी बंद राहतील.
• सरकारी कार्यालयीन कामासाठी पूर्व परवानगी आवश्यक असेल.
• गर्दी कमी होत नसेल तर दारूची दुकाने देखील पूर्णपणे बंद केली जातील.
• विनाकारण फिरणारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
त्यामुळे सर्वांनी मिळून या नियमांचे व्यवस्थित व काटेकोरपणे पालन करावे.
إرسال تعليق