कोरोनाचा काळ चालू आहे आणि त्यामुळे कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता महाराष्ट्रासह देशभरात सर्व शाळा आणि कॉलेजेस तसेच विद्यालयीन पदविकां सह सर्व सरसकट 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला होता.
मात्र यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे हे पालकांच्या देखील लक्षात येऊ लागल्याने आता ज्याठिकाणी कोरोना रुग्ण संख्या कमी आहे त्या ठिकाणी काही पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्या संदर्भात माहिती दिली आहे. शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत असे बहुतेकांचे मत होते.
या दिवसांपासून होणार शाळा सुरू
शाळा सुरू करण्यात याव्यात यासाठी मुख्य मंत्र्यांकडे चर्चा करून 24 जानेवारी पासून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात येत होती होती.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण संख्या दर कमी आहे त्या ठिकाणी 24 जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक जिल्हा पातळीवर जिल्हा अधिकारी तसेच महापालिका आयुक्त तहसीलदार हे राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतील. आणि 24 जानेवारी पासून 1 ली ते 12 वी पर्यंत चे सर्व वर्ग सुरू होतील. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मात्र शाळा सुरू करताना सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे.तेव्हाच शाळा सुरू करण्यात येतील. तसेच पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत येता येईल. कारण कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी काळजी आपण घेणार आहोत. असे मत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
मात्र निवासी वस्तीग्रहांत काही ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाला होता त्यामुळे या निवासी वस्तीग्रहांबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील
आपले नुकसान ना करून घेता व्यवस्थितपणे कोरोना नियमावलीचे पालन करून व्यवस्थितपणे शिक्षण घ्यावे.
إرسال تعليق