रेशनकार्ड म्हंटल की सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचा विषय आणि या संबंधित काही कामे असतील तर त्यासाठी त्यांची होणारी धावपळ लक्षात घेता खूप वैताग होतो.
आणि हाच होणारा त्रास हीच होणारी धावपळ लक्षात घेता केंद्र सर
कारने कोरोना काळात "वन नेशन वन रेशन" ही योजना सुरू केली आहे.त्याला पूरक म्हणून "मेरा रेशन" या स्वतंत्र मोबाईल अप्लिकेशनची निमिर्ती करण्यात आली आहे.
या अप्लिकेशन च्या मदतीने आपण रेशन कार्ड संबंधी बरीच कामे घरबसल्या देखिल करू शकतो. याच्या मदतीने आपण इतर राज्यात स्थलांतर झालेल्या रेशन कार्ड मध्ये देखील घरबसल्या बदल करू शकतो. तसेच रेशनकार्ड स्थलांतर केल्यानंतर तुम्ही कोणत्या धान्यासाठी पात्र आहात, तसेच जवळच्या स्वस्त धान्य दुकानाची माहिती देखील याद्वारे दिली जाते. नवीन रेशनकार्ड साठी अर्ज करायचा असेल तर आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. "मेरा रेशन "या एप्लिकेशन च्या मदतीने घरबसल्या सहज अर्ज करू शकता.
"मेरा रेशन"हे एप्लिकेशन तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता.
छान
ردحذفإرسال تعليق