कोरोना काळात अस एकही क्षेत्र नाही की त्यावर कोरोनाचा परिणाम झाला नाही. या वेळी सर्व धंदे आणि उद्योग व्यवसाय ठप्प पहिली असून काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि या काळात होणारी महागाई आणि नविन वर्षाच्या सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारकडून आकारले जाणारे टॅक्स आणि विविध प्रकारच्या करवाढी आणि त्यामुळे मोठमोठया उद्योग धंद्यांपासून ते अगदी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे.जसे की इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, आणि यासारख्या असंख्य गोष्टी ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला तोंड द्यावे लागत आहे.
आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजे या वर्षीची गाड्यांच्या प्रिमियम विमा प्लान मध्ये होणारी दरवाढ.मात्र दोन वर्षांपासून कोरोनामुळे वाहन विम्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.परंतु या नवीन वर्षाच्या सुरुवातिला वाहन विम्यात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील 25 विमा कंपन्यांनी विमा नियामक इर्डाला थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव सादर केला आहे.
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या वाढीत घट आणि पर्यायाने वाहनांच्या विक्रीत घट झाल्यामुळे मोठया प्रमाणावर वाहन विम्यांचे नुकसान झाले आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये वाहन विम्यात 3.9 टक्के वाढ झाली आहे मात्र कोरोनापूर्वीच्या काळात त्या तुलनेने हे प्रमाण अजूनही 5.1टक्के कमीच आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे वाहन विम्यांचे 1.7 टक्के नुकसान झाले आहे. अशी माहिती BAI( Bajaj Aliyanjh Insurance) चे मुख्य वितरण अधिकारी आदित्य शर्मा यांच्याकडून देण्यात आली आहे.
TP (third party insurance) चा प्रिमियम वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे.त्यामुळे इर्डा ने यावर्षी third party प्रिमियम वाढवण्याचे संकेत दिले आहेत.साधारण प्रमाणे दरवर्षी मोटार विमा मध्ये वाढ करण्यात येते, मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून ही वाढ केली नव्हती.
मात्र या नवीन वर्षात यात वाढ होण्याची शक्यता आहे.
إرسال تعليق