विविध कलाक्षेत्रात विविध प्रकारचे कलाकार आहेत, जसे की चित्रपटांत अभिनेता, अभिनेत्री, गायन क्षेत्रात गायक, क्रिकेट मधील विविध खेळाडू आणि यांसारख्या अनेक क्षेत्रातील असंख्य कलाकार निर्माण होतात. आणि एक दिवस या जगाचा निरोप घेतात.

त्याचेच एक उदाहरण म्हणजे आपल्या देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

रात्रीच त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर टाकली होती.

४ फेब्रुवारी १९३८ रोजी त्यांचा जन्म लखनऊ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हे ब्रिजमोहन मिश्रा असे होते. त्यांचा मृत्यु झाला तेव्हा ते दिल्ली येथील त्यांच्या घरी होते.रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानेत्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

माझी कलेची सुरुवात बंगाल मध्ये झाली. आणि महाराष्ट्राने खूप मानसन्मान दिला, त्यामुळे मी बंगालला माझी माता आणि महाराष्ट्राला माझा पिता मानतो, असे ते नेहमी म्हणत.

देशाचे  नाव उंचावणाऱ्या या कलाकारास मनपूर्वक श्रद्धांजली.

Post a Comment