भारत मध्ये अनेक विशेष दिन वेगवेगळ्या प्रकारच्या कारणासाठी साजरे केले जातात. जसे की शिक्षक दिन, बालिका दिन,युवक दिन आणि यासारखे अनेक.त्यांपैकीच एक म्हणजे आर्मी डे. 

या कारणामुळे साजरा केला जातो आर्मी डे. जाणून घ्या सविस्तर.

फील्ड मार्शल के. एम. करियप्पा. यांनी शेवटचे ब्रिटिश कमांडर सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडुन १९४९ साली भारतीय लष्कराची जबाबदारी स्वीकारली होती.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी (१७७६ )च्या वतीने भारतीय लष्करी सेनेची स्थापना करण्यात आली होती. आज देशभरात भारतीय लष्कराच्या ५३ मुख्य छावण्या असून ९ महत्वाचे लष्करी तळ आहेत.

जगातील सर्वात उंच रणभूमी असणाऱ्या/म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियर मध्ये जिची समुद्र सपाटीपासूनची एकूण उंची ही ५ हजार मीटर अंतरावर आहे.मात्र भारतीय लष्कर आणि त्यातील प्रत्येक जवान नेहमी आपल्या प्राणाची बाजी लावत आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करून तेथील वातावरणाशी संघर्ष करत, नेहमी देशसेवेसाठी तयार असतात.

१८३५ साली आसाम रायफल्स ची स्थापना करण्यात आली होती. आणि ही आपल्या देशातील सर्वात जुनी पॅरा मिलिटरी फोर्स आहे.

१९७१ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत पाकिस्तान च्या तब्बल ९३ हजाराहून अधिक सैनिकांना त्यांच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांसहित बंदी बनवण्यात आले होते.

आणि याच युद्धानंतर बांग्लादेश या देशाची बांग्लादेश या नावाने स्वतंत्र देशाची निर्मिती झाली होती. हिमालय पर्वताच्या कुशीत असणाऱ्या 

द्रास आणि सुरू नद्यांच्या दरम्यान लडाखच्या घाटात जगातील सर्वात उंच पूल जो बेली नावाने ओळखला जातो. तो पूल देखील १९८२ साली भारतीय लष्करातील सुरवीर जवानांच्या मदतीनेच बांधण्यात आला होता.

लष्करातील भ्रष्टाचाराला आला घालण्यासाठी आणि सीमेवरील माहिती गुप्तपणे मिळविण्यासाठी १९४१ साली डायरेक्टोरेट ऑफ मिलिटरी अँड इंटेलिजन्स म्हणजेच डी. एम. आय. ची स्थापना करण्यात आली.

तसेच १९७१ सालच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात केवळ २०० भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या २ हजार च्या वर अधिक जवांनासी युद्ध करत या युद्धात पाकिस्तानी सैन्याला नमवले होते. यावेळी काही जवान शहीद देखील झाले होते.


त्यानंतर १९९९ साली झालेले कारगिलचे युद्ध १८ हजार फूट उंचीवर लढले गेले होते. हे  युद्ध जवळपास दोन महिने चाललेले जगातील सर्वात उंच लढले गेलेले युद्ध आहे.या युद्धात देशासाठी लढणाऱ्या जवळपास ५२७ हुन अधिक जवानांना वीर मरण पत्करावे लागले होते.तर १३ हजाराहून अधिक जवान जखमी झाले होते.

तर शत्रू राष्ट्र अर्थात पाकिस्तानचे देखील १० हजाराहून जवान मरण पावले होते.

तसेच आपल्या संविधानात देखील तरतूद आहे की  देशातील तरुणांना देशाच्या लष्करात जबरदस्तीने भरती करण्यात यावे. मात्र तरुण पिढीला देशसेवा करण्यासाठी ते स्वतःहून मेहनत करून लष्करात भरती होऊन प्राणाची बाजी लावत,शौर्य दाखवतात.

अशा या आपल्या देशासाठी आणि देशातील जनतेसाठी दिवस रात्र देश सेवेसाठी सज्ज असणाऱ्या आणि प्राणाची बाजी लावून देशसेवा करणाऱ्या  वीर जवानांना आर्मी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



1 تعليقات

إرسال تعليق