या कारणामुळे साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन.
आज १२ जानेवारी अर्थात थोर राष्ट्रीय महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती.
युवकांचे चारित्र्यवान प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंद यांचे पवित्र चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा आदर्श घेतला जातो. देशातील तरुण पिढी जर योग्य आणि उचित दिशेने कार्य करत असेल तर त्या देशाला प्रगतीपथावर जाण्यास कोणीही थांबवू शकत नाही.
कारण कोणत्याही देशासाठी त्या देशातील तरुण पिढी ही त्या देशाचा विकास होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो. जेणेकरून आपल्या देशातील तरुण देशसेवेसाठी त्याच्या मनात देशाप्रती प्रेम निर्माण होऊन तो देश सेवेसाठी तयार व्हावा.
हाच महत्वाचा मुद्दा लक्षात घेत आपल्या देशाच्या इतिहासातील थोर महापुरुषांपैकीच एक थोर आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस म्हणजेच १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
युवक दिनाविषयी सविस्तरपणे:
१२ जानेवारी रोजी आपल्या संपुर्ण देशभरात ज्याठिकाणी युवक पिढी जास्त प्रमाणात असते तेथे जसे की शाळा, महाविद्यालये, तसेच विविध सरकारी कार्यालये ज्या ठिकाणी युवक जास्त प्रमाणात असतात.
त्या ठिकाणी विविध प्रकारच्या परेड वगैरे करून विविध प्रकारच्या कला साजऱ्या केल्या जातात. उदा. कला,नाटक, देशभक्तीपर, गीते,गायन, तसेच स्वामी विवेकानंद यांचे साहित्य, आणि देशातील इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करून कलेच्या माध्यमातून युवकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
१९८४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केले. आणि या दिवसाचे महत्व लक्षात घेऊनच भारत सरकारने देखील याच वर्षांपासून भारतात देखील १२ जानेवारी पासून राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्याचे घोषित केले.
राष्ट्रीय दिनाचे विशेष महत्त्व:
भारतीय धर्माचा, ध्यान, योग्य, आणि मानवी विकास यांचा प्रसार खऱ्या अर्थाने निर्माण करायचा असेल तर,
आपल्या देशातील तरुण पिढी देखील त्या प्रकारच्या स्वप्नाने भारावून जाऊन देश सेवा करण्यासाठी अभिमानाने तयार झाली पाहिजे. स्वामीजींचे जीवन हे अध्यात्मिक अनुभवाच्या कसोटीतुन घडलेले आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर भारतातील प्रत्येक तरुण युवा पिढी भारतीय संस्कृती तसेच आपल्या धर्माच्या कार्यासाठी झटला पाहिजे. हा महत्वाचा उद्देश हा युवक दिन साजरा करण्यामागे आहे.
आणि याच कारणामुळे १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवशी भारतात राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो.
إرسال تعليق