गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये 5G  सेवा येणार आहे आणि ही सेवा ग्राहकांना वापरता यावी किंवा उपलब्ध करून देण्यासाठी या 5G network तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

येत्या पुढील काही महिन्यांत भारतात 5G सेवा सुरु होणार असल्याचे कळत आहे. मात्र ही 5G सेवा सुरुवातीला देशातील फक्त ठराविक किंवा महत्वाच्या शहरांतच चालू करण्यात येईल, असी माहिती भारतीय दूरसंचार म्हणजेच DOT या संस्थेने दिली आहे.

या नवीन वर्षात म्हणजे 2022 येत्या काही दिवसांत महत्वाच्या शहरांत 5G सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये पुणे, मुंबई, कोलकाता,गुरुग्राम,चंदिगढ, दिल्ली, बंगळुरू,जामनगर,चेन्नई,अहमदाबाद, गांधीनगर,हैद्राबाद, आणि लखनऊ, 

ही 5G सेवा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी दुरसंचार क्षेत्रांतील विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या या 5G सेवेच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेत आहेत.जसे की भारती एरटेल, आयडीया,बी.एस. एन.एल.,आणि रिलायन्स जिओ.

सध्या सुरू असलेल्या 4G तंत्रज्ञानाच्या कितीतरी पटीने आणि अधिक वेगाने ही 5G सेवा असेल आणि यामुळे अगदी काही सेकंद,किंवा मिनिटांतच आपण उच्च प्रतीचे व्हिडिओस, चित्रपट, किंवा, लाखो प्रतिमा डाउनलोड करू शकतो.

त्यामुळे एकूणच 5G सेवा आल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक विकास होऊन काम करण्याची गती वाढेल, आणि देशाचा विकास होण्यास देखील मदत होईल.

Post a Comment