मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीतील जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीतील अभिनेते अजिंक्य देव यांचे ते पिता होते.

त्यांचा मृत्यू झाला आहे असे त्यांच्या मुलानेच सोसिएल मीडिया वर कळवले.रमेश देव हे केवळ अभिनेताच नाही तर चित्रपट दिग्दर्शक, आणि निर्माते सुद्धा होते. 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यांनी "आंधळा मागते एक डोळा" या 1956 साली आलेल्या मराठी चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 

त्यांना "आनंद"या चित्रपटासाठी केलेल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे ते ओळखले जाऊ लागले.तसेच त्यांनी काही हिंदी चित्रपटांत देखील काम केले होते. "आरती" हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 

त्याअगोदर त्यांनी "पैशांचा पाऊस",आणि "भाग्य लक्ष्मी" यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही मालिकांत देखील काम केले होते. व त्यांनी स्वतः देखील अनेक नाटके तसेच टीव्ही मालिकांची देखिल निर्मिती केली होती.

1962 मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव सोबत ते विवाह बंधनात अडकले. त्यांनी एकत्र येऊन अनेक चित्रपटांत देखिल काम केले होते. सुप्रसिद्ध अभिनेता "अजिंक्य देव" हा देखिल रमेश देव यांचाच मुलगा असून त्याने देखील अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.


Post a Comment