आपण जीवन जगत असताना रोजची धावपळ पाहता अनेक गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देत नाही. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक असे ग्रंथ, धर्मशात्र आहेत. की ज्यात थोर महात्मे आणि संतांनी मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी जीवन कसे जगले पाहिजे. जीवनात कोणत्याही गोष्टी करण्यासाठी कोणती वेळ, कोणता दिवस, चांगले आहे यासंबंधी अनेक लेख साहित्य लिहून ठेवलेले आहेत.त्यागोष्टीपैकीच एक म्हणजे जसे की केस कधी कापवित, नखे कधी कापवित, मात्र आजच्या धावपळीच्या जगात या क्षुल्लक गोष्टींकडे कोणीही सहसा लक्ष देत नाहीत.
आणि नक्कीच याचा आपल्या जीवनावर कदाचित वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे असा काही परिणाम आपल्या जीवनावर होऊ द्यायचा नसेल तर आपण नक्कीच अशा काही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जसे की केस आणि नखे फक्त या दिवशी कापली नाही पाहिजेत.
आणि हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वाराचे वेगळेच महत्व आणि वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण केस आणि नखे कापण्यासाठी देखील या योग्य दिवसांचाच वापर केला पाहिजे.तर याच गोष्टींविषयी सविस्तर जाणून घेऊ.
सोमवार, मंगळवार, गुरुवार, आणि शनिवार या दिवशी कधीच कापू नयेत केस आणि नखे:
• शनिवार: शनिवार हा शनिदेवाची पुजा करण्यासाठी उत्तम असतो. अनेकजण या दिवशी शनिदेवाचा उपवास करतात, त्यामुळे यादिवशी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते.
• सोमवार: या दिवशी उपवास करून महादेवाला सेवा अर्पण केली जाते. या दिवशी केस आणि नखे कापल्यास शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या पुत्रांना हानी होऊ शकते. सोमवारचा संबंध चंद्राशी असल्यामुळे या दिवशी केस व नखे कापल्यास आरोग्यास हानी होते.
• गुरुवार: गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि धनाची देवता लक्ष्मी यांचा व्रत किंवा उपवास करण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे यादिवशी नखे कापल्यास लक्ष्मी नाराज होते. आणि यामुळे याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.त्यामुळे या दिवशी नखे आणि केस कापणे टाळावे.
• मंगळवार: या दिवशी केस व नखे कापल्यास मनुष्याचे आयुष्य कमी होते किंवा घटते. त्यामुळे या दिवशी केस कापणे टाळावे.
मात्र बुधवार,शुक्रवार, आणि रविवार या दिवशी नखे आणि केस कापल्यास खूप लाभ होऊ शकतो.
• शुक्रवार: हा भौतिक सुख सुविधाचा दिवस त्यामुळे या दिवशी नखे कापण्यास काहीच हरकत नाही.
• बुधवार: हा देखील शुभ दिवस मानला गेला आहे. यादिवशी नखे आणि केस कापल्यास घरातील समृद्धी वाढीस लागते.
• रविवार: रविवारी नखे आणि केस कापल्यास आपल्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते. तसेच धन दौलत देखील वाढते.
अशा प्रकारे आपण योग्य त्या दिवशीच केस व नखे कापली पाहिजेत.
टिप्पणी पोस्ट करा