दरवर्षी प्रमाणे बोर्डाच्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात सुरु होत असतात म्हणजे बारावीची परीक्षा 4 मार्च ला सुरु होते.
आणि दहावीची परीक्षा 15 मार्च पासून सुरू होत असते.मात्र कोरोनाचा कहर चालू असल्याने गेली दोन वर्षे जवळपास निम्याहून अधिक परीक्षा या ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या.
तर दहावी आणि मग बारावीच्या परीक्षा रद्द देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र यावेळी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळात चर्चा केली जाणार आहे.
त्याअगोदर या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येणार आहेत. अशी माहिती आणि परवानगी सदर प्रस्तावात संमत करण्यात आली आहे.
त्यामुळे दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यान होणार असून,
दहावीच्या लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.
त्याचप्रमाणे बारावीच्या देखील तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या वेळेत होणार असून
बारावीच्याच लेखी परीक्षा या 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान होणार आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारीला लागणे महत्वाचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा