आपण जर आत्मविश्वासाने एखादी गोष्ट बोलू शकलो तरच ती इतरांना समजण्यास जास्त मदत होते. मात्र याच आत्मविश्वासाच्या कमीमुळे अनेकजण ग्रासलेले असतात. ज्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र असे काही मार्ग देखील असतात जे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करतात.
जाणून घ्या सविस्तर:असा वाढवा स्वतःचा आत्मविश्वास:
1. नेहमी नकारात्मक गोष्टींपासून लांब राहील पाहिजे. तसेच होकारात्मक गोष्टींना जवळ केल पाहिजे. आपल्या सोबत चांगलं वागतात, बोलतात केवळ अशाच मित्र आणि नातेवाईकांना आपल्या जीवनात येऊ द्या.आपली कुचेष्टा करणारे आपल्या पाठीमागे वेगळंच काहीतरी हिनवणी करणारे अशा व्यक्तींना आपल्या जीवनात जागा देऊ नका.
2.तुमची एखाद्या गोष्टीवर देण्याची प्रतिक्रिया आणि शारीरिक हालचाल बदला कारण यासाठी आपल्या हालचाली या होकारात्मक आणि आत्मविश्वासू असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नेहमी हसत खेळत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हसण्याने आपणच नाही तर आपल्या जवळील वातावरण आणि तेथील लोकांत देखील एक प्रकारे आनंद निर्माण होण्यास मदत होते. नेहमी छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नेहमी आत्मविश्वासू व्यक्तींच्या सानिध्यात राहणे केव्हाही चांगले असते. तसेच जेव्हा कुणाला भेटता तेंव्हा त्यांच्या सोबत अगदी आत्मविश्वास आणि त्यांच्या नजरेत नजर घालून संपर्क साधला पाहिजे. नेत्र संपर्क करणे हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे साधन आहे.
3. व्यवसाय आणि वैयक्तिक कारणांसाठी एखाद्याला भेटाल तेव्हा नेहमी त्यांच्या सोबत बोलत असताना नेत्र संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास तपासणी करायचा असेल तर तो बोलताना किती वेळ आणि कशा प्रकारे नेत्र संपर्क करतो यावरून त्याचा आत्मविश्वास माहिती करून घेतला जाऊ शकतो.
4.प्रत्येक गोष्टीला उपाय असतो फक्त तो शोधून काढला पाहिजे किंवा आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखू नका.
5.आपली हार मान्य करू नका मात्र त्यामध्ये असणारी चूक शोधण्याचा प्रयत्न करा. आणि तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. कमी आत्मविश्वास हा देखील खूप हानिकारक असतो. ज्यामुळे आपणाला अनेक वेळा बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
6.आपली तुलना इतरांसोबत कधीही करू नका. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तसेच नेहमीच नवनवीन आणि सकारात्मक गोष्टींचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करा.
7.आणि कोणत्याही वेळी ना डगमगता परस्थितींना सकारात्मक प्रतिसाद देत सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
अशाप्रकारे जर तुम्ही या सर्व गोष्टी अंगिकारल्या तर तुमचा आत्मविश्वास वाढून एकूणच सर्व जीवनच सकारात्मक आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात होईल. आणि कदाचित तुम्ही इतरांसाठी देखील एखादे उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा देखील आत्मविश्वास वाढवण्यास मदत कराल.
टिप्पणी पोस्ट करा