हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ अर्थात जयकिशन काकुभाई श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1965 रोजी महाराष्ट्रातील उदगीर येथे झाला होता.
घरची परिस्थिती एकदम बिकट असल्याने त्यांनी 11 वी नंतर शिक्षण सोडून देऊन प्रसिद्ध ताज हॉटेल येथे एका apprentice च्या हाताखाली काम करू लागले. नंतर एअर इंडिया मध्ये flight attendant म्हणून काम सुरू केले.
कमी शिक्षण असल्याने मात्र काही दिवसांनंतर त्यांना या दोन्ही जागेवरून काढण्यात आले.
नंतर ते मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी शेजारील एका trade wings नावाच्या खाजगी ट्रॅव्हल्स बस एजंसित काम सुरू केले. एक दिवस त्यांची भेट एक जाहिरातदारासोबत झाली आणि तिथून त्यांचा modelling चा प्रवास सुरु झाला.
आणि नंतर 1982 मध्ये देव आनंद (प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते) यांच्या "स्वामी दादा" या चित्रपटांतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
आणि नंतर त्यांनी हिरो, युद्ध, कर्मा, त्रिदेव, अंतरमहल यांसारखे अनेक सुप्रसिद्ध चित्रपट दिले. आजवर त्यांनी 200 च्या वर चित्रपटांत काम केले असून. त्यांचा मुलगा देखील tiger shroff चित्रपट श्रुष्टीतील एक उगवत तारा म्हणून प्रसिद्धीस येत आहे.
त्यांनी अगोदर मॉडेलिंग आणि नंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
टिप्पणी पोस्ट करा