जेव्हा कोणीही आजारी पडतो मग तो माणूस असो अथवा जनावरे त्याला आजारातून बरे होण्यासाठी आवश्यकता असते ती लवकरात लवकर बरे होण्याची
आणि बरे होण्यासाठी औषधे मुख्य भूमिका पार पाडतात. त्यात या कोरोनाच्या काळात औषधे आणि त्याच्या मागणीला खूप मोठी गती प्राप्त झाली आहे.
आपले आणि स्वतःच्या व्यक्तींचे रक्षण करण्यासाठी आपण अधिक अधिक महागडी औषधे खरेदी करत असतो.आणि अशात आपण कधी लक्षच देत नाही की ही औषधे खरी आहेत की खोटी आणि यावेळी मागणी वाढली की बनावट गोळ्या औषधे बनवून अनेकजण आपला धंदा चालवतात.
मात्र यामुळे अनेकदा बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागतात.मात्र याच गोळ्या औषधांच्या बनावट कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून पुढील जानेवारी 2023 पासून यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
या नियमानुसार औषध कंपन्या औषधांवर एक QR code टाकतील आणि त्यामुळे आपल्याला त्या गोळ्या व औषधांची किंमत आणि त्यातील घटकांची सर्व माहिती दिली जाईल.ज्यामुळे बनावट औषधे आणि त्याच्या सर्व प्रकाराला आळा घालण्यात येऊन सर्वसामान्य ते सर्वांचे आरोग्य आणि पैसे या दोनही गोष्टींचे व्यवस्थितपणे पालन करावे लागणार आहे.
हा QR कोड आपण आपल्या मोबाईल वरून सहजपणे scan करू शकतो.जेव्हा हा QR code scan केला जाईल तेव्हा आपल्याला आपोआप त्या संबंधित गोळ्या औषधांची किंमत आणि ते कोणत्या घटकांपासून किती प्रमाणात बनवण्यात आले आहे ही सर्व माहिती दिली जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा