आजच्या घडीला जगभर कोरोनाचा कहर चालू असताना बहुतेक जणांचे खुपच नुकसान झाले आहे. आणि या मध्ये सर्वात जास्त नुकसान झाले ते म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे.गेली दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ चालू असताना जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनाची दहशत एखाद्या आतंकवाद्यांप्रमाणे पसरली आहे.एवढच काय तर काही खरेदी करायची असेल तरी लोक पैसे देताना आणि घेताना घाबरतात. मात्र अशा वेळी सर्वात उपयोगी आला तो म्हणजे क्यू आर कोड मात्र बरीचशी अशी माणसे आहेत की जे क्यू आर कोड तर वापरतात, मात्र त्यांना माहीतच नसते ते काय आहे आणि कसे काम करते.
चला तर जाणून घेऊ की,
१.क्यू आर कोड म्हणजे काय ?
२.तो कसा बनवला किंवा तयार केला जातो ?
३.तो कोणी शोधला ?
४.QR code आणि त्याचे प्रकार किती?
५.आणि तो कोणत्या कामासाठी वापरला जातो ?
● क्यू आर कोड म्हणजे काय ?
QR CODE म्हणजेच Quick Response Code असा याचा अर्थ होतो.ज्यावेळी आपण मोबाईल वापरत असतो. आणि बऱ्याच वेळी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच पैशांचा व्यवहार करत असतो. जसे की एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी, एखाद्यकडून पैसे घेण्यासाठी, आणि अशा अनेक कामासाठी याचा वापर केला जातो.
QR code म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या चौकोनात त्या संबंधित व्यक्तीची सर्व माहिती एकदम अचूक आणि योग्य प्रकारे संग्रहित केलेली असते. ज्यामुळे तो सहज केव्हाही वापर करण्यासाठी तयार असतो.
ज्याप्रमाणे Barcode असतो त्याच प्रमाणे QR Code देखील असतो. मात्र या दोघांतील फरक असा आहे की, QR code हा Barcode पेक्षा अधिक माहिती साठवून ठेवतो. आणि Barcode पेक्षा QR Code ची क्षमता अधिक असून काम करण्याची क्षमता देखील खुप जास्त असते.आणि याच मुख्य कारणामुळे आज जगभरात Barcode च्या तुलनेत QR Code चा अधिक प्रमाणात वापर केला जातो.
● तो कसा बनवला किंवा तयार केला जातो ?
QR code बनवण्यासाठी १ ते ९ या दरम्यान च्या संख्यामालेचा वापर केला जातो.म्हणजेच १,२,३,४,५,६,७,८,९,आणि ० तसेच A ते Z या दरम्यान च्या इंग्रजी भाषेतील अक्षरांचा वापर केला जातो. जसे की, a, b, c, d.इत्यादी.आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अक्षरे किंवा मानद तत्वे यांचा समावेश करण्यात येतो. म्हणजेच,@,#,$,%,&,यांसारखी अक्षरे.अशा प्रकारे आपण/वापरकर्ता आपल्या सोयी आणि वापरानुसार QR code बनवून घेऊ शकतो.
● याचा शोध कोठे व कोणी लावला ?
जपान मधील वाहन क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अग्रगण्य कंपनी Denso Wave या कंपनीने वाहन Tracking साठी Barcode ची निर्मिती केली होती. मात्र barcode च्या मर्यादित काम करण्याच्या क्षमतेमुळे तेथे काम करीत असताना विविध प्रकारच्या अडचणी येत असत. आणि याच कारणामुळे या कंपनीने १९९४ साली Barcode प्रमाणेच मात्र त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूकपणे काम करणाऱ्या प्रणालीचा शोध लावला. म्हणजेच QR code चा शोध लावण्यात आला.
आणि हा QR code त्यांनी केवळ आपल्या कंपणीपुरताच मर्यादित न ठेवता, २००२ साली जपान मधील सर्व सामान्य जनतेसाठी देखील वापरात आणला.मात्र आता हाच QR code जपान पूरपताच मर्यादित न राहता संपुर्ण जगभर परिचित होऊन त्याचा वापर केला जात आहे.
● QR code आणि त्याचे वेगवेगळे प्रकार
QR code चे मुख्य दोन प्रकार आहेत.
१.Dynamic QR code
२.Static QR code
• Dynamic QR code,
Dynamic QR code हा Static QR code पेक्षा अधिक वेगवान असल्यामुळे जास्त माहिती मिळवून देऊ शकतो. जो की एक प्रकारचा Live QR code असतो.आणि याच कारणामुळे याला Unique QR code म्हणून देखील ओळखले जाते. यापासून आपल्याला स्कॅन करणाऱ्याचे नाव, इमेल आय डी,किंवा कितीदा स्कॅन करण्यात आला होता, आणि Conversation rate इत्यादी. माहिती अचूक आणि जलद गतीने मिळते.
• Static QR code
हा QR code हा एखादी माहीती किंवा सुचना सार्वजनिक करण्यासाठी TV, News paper, किंवा Posters द्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहचवला जातो. जसे की विविध सरकारी कामासाठी याचा वापर केला जातो. उदा. COVID-१९च्या काळात याची नियमावली तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेला QR code मात्र यापासून मर्यादितच माहिती मिळते. म्हणजे हा किती वेळा Scan केला गेला इत्यादी.
● QR code कोणत्या कामासाठी वापरला जातो.
याचा शोध लागल्यापासून सर्वप्रथम हा पैशांचा व्यवहार करण्यासाठी २०११ मध्ये Royal dutch mint या संस्थेद्वारे वापर करण्यात आला होता. मात्र आता जगभर याचा वापर केला जातो आहे. जसे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी, पैसे घेण्यासाठी, विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात देखील व्यावसाईक याचा वापर केला जातो.
याचा वापर करण अगदी सोप आहे. सर्वप्रथम आपला किंवा समोरच्याचा मोबाईल उघडून Google pay Phone pay अशा ठिकाणी हा QR code असतो.तो सहज Scan karun आपण त्याचा हवा त्या कामासाठी वापर करून घेऊ शकतो.
अशा प्रकारे ही आहे QR code ची सविस्तर माहिती जी की प्रत्येक QR code वापरणाऱ्या ग्राहकांना/व्यक्तींना माहीत असायला पाहिजे.
ही महत्व पूर्ण माहिती इतरांना देखील share करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा