दिवसेंदिवस मोबाईल वापरकर्ते वाढत असून त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सिम कार्ड कंपन्या देखील आपल्या रिचार्ज मध्ये वाढ करताना दिसतात.
रिचार्ज तर एका महिन्याचा करावा लागतो मात्र या कंपन्या एक महिन्याच्याऐवजी केवळ २४,किंवा २८ दिवसच सेवा पुरवतात मात्र ग्राहकांकडून तर एक महिन्याचा चार्ज वसूल करतात.
आणि ग्राहकांची हीच तक्रार आता लक्षात घेता TRAI अर्थात telecome rugulatory of india ने ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेत दूरसंचार कंपन्यांना आता २८ ऐवजी ३० दिवसांच्या वैधतेचा प्लॅन जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जर ग्राहकाला चालू प्लॅन च्या त्याच तारखेपासून रिचार्ज करायचा असेल तर ती सेवा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे आता रिचार्ज वैधता २८दिवसांएवजी ३०दिवसांची मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा