तृतीय पंथी म्हंटलं की समाजात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळाच असतो. मात्र याच तृतीय पंथीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा महाराष्ट्रातील पवन यादव ने LLB चे शिक्षण घेतले असून तो वकील झाला आहे.
समाजाकडून नेहमीच सन्मान आणि आदरापासून वंचित राहिलेल्या तृतीय पंथीय समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी आपण प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतो हे दाखवून देण्यासाठी काम करणार आहोत असा उद्देश हा शिक्षण घेण्यामागे आहे असे म्हंटले आहे.
तृतीय पंथी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा आणि मुंबई येथील गोरेगाव मध्ये राहणारा पवन यादव हा महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सजेंडर वकील ठरला आहे.
ट्रान्सजेंडर असतानाच त्याचे वकील होण्याचे स्वप्न केवळ त्याच्या आई वडील या दोघांमुळेच पूर्ण झाले आहे असे तो सांगतो.आपला मुलगा हा षंढ किंवा तृतीय पंथी असल्याचे कळाल्यास काही पालक प्रेम करतात. तर काही पालकच मात्र आपल्या पाल्याचा रागराग किंवा तिरस्कार करतात.आणि त्यामुळे समाजात देखील त्याच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन आणखीनच बदलून जातो.
मात्र त्यांच्या पालकांनी मात्र त्याला खूप प्रेमाने आणि सन्मानाने वाढवले आणि त्यामुळेच तो LLB या उच्च शिक्षणापर्यंत पोहचू शकला,असे सांगतो.
टिप्पणी पोस्ट करा