तामिळनाडूतील दिवंगत मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीतील प्रसिद्ध अभिनेते एम.जी. रामचंद्रन  यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी झाला.

मदूर गोपालन रामचंद्र अर्थात एम. जी. रामचंद्रन. यांनीच तामिळनाडूतील प्रसिद्ध राजकीय पक्ष अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली होती.

सन १९७७ ते १९८७ या काळात ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी काही काळ त्यांच्या भावासमावेत नाटकांत देखील काम केले होते.

 १९३६ साली आलेल्या सती लीलावती या चित्रपटात त्यांना साहायकाची भूमिका मिळाली, येथून त्यांचा चित्रपट श्रुष्टीतील प्रवास सुरु झाला.१९४० पर्यंत त्यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळू लागुन पुढील तीन दशके तामिळ चित्रपट श्रुष्टीत त्यांचा दबदबा राहिला.

चित्रपट श्रुष्टी गाजवल्यानंतर त्यांनी मात्र 

राजकारणाकडे कल घेऊन एम. जी. आर. डी.एम.के. पक्षाचे सदस्य झाले. 

१९६७ साली त्यांनी द्रविड पक्ष सोडून अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली.चित्रपटांतील लोकप्रियतेमुळे त्यांना  राजकारण करताना खूप मोठा जनाधार निर्माण होऊन ते लोकप्रिय नेते  होऊन १९७७ साली पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.

चित्रपटातील अभिनेता मुख्यमंत्री झाला ही भारतीय राजकारणातील पहिलीच वेळ होती.१९८७ साली ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी देखील ते मुख्यमंत्री पदावर होते.

२४ डिसेंबर १९८७ त्यांच्या निधनाच्या दिवशी जी अंत्ययात्रा निघाली होती तशी अंत्ययात्रा जगाच्या पाठीवर कुठेही निघाली नाही.असे देखील त्यावेळी म्हंटले जात असे.


Post a Comment