विना इंटरनेट आता मोबाईल वरच मिळतील रेशन कार्ड संबंधित महत्वाचे अपडेट मेसेजेस/जाणून घ्या सविस्तर:
रेशनकार्ड संबंधी महत्वाचे अपडेट्स आता मोबाईल वर देखील मिळणार आहेत.ग्राहक सेवेत सुलभता आणण्यासाठी शासनाने ही सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राहकांचा मोबाइल नंबर रेशन कार्ड शी लिंक करणे आवश्यक आहे.
वन नेशन वन रेशन या मोहिमेअंतर्गत नागरी अन्न पुरवठा अधिक सुलभ आणि ग्राहक केंद्री होण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या सेवेचा लाभ घेता येईल यासाठी संकेतस्थळ, आणि मेरा रेशकार्ड या अँड्रॉइड एप ची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना इंटरनेट अभावी आणि शहरी भागातील काही ग्राहकांना इंटरनेट वापरता येत नसल्याने रेशनकार्ड संबंधी विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असे.तसेच रेशनकार्ड संबंधित ऑनलाईन माहिती मिळवण्यासाठी खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे हाच होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने मोबाईल वर रेशन कार्ड संबंधी माहिती मेसेजेस द्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ग्राहकांचा मोबाइल नंबर रेशनकार्ड शी लिंक असेल त्यांना ही माहिती मिळवता येईल. ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी खालीलप्रमाणे आपला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे.
मोबाईल नंबर रेशनकार्ड शी जोडण्याची पद्धत एकदम एकदम सोपी असून घरबसल्या देखील आपण हे काम करू शकतो. यासाठी सर्वप्रथम आपण https://nfsa.gov.in/state/MH या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तेथे update your Mobile number ya पर्यायावर क्लिक करून त्यापुढे दिसणाऱ्या Adhaar no.of head of house hold /NFS ID
या पहिल्या बॉक्स मध्ये कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड क्रमांक टाकावा.
पुढच्या बॉक्स मध्ये रेशनकार्ड क्रमांक टाकून त्यापुढील बॉक्समध्ये कुटुंबातील प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटी जो मोबाइल क्रमांक लिंक करायचा आहे तो टाकावा.
अशा प्रकारे आपण एकदम सरळ सहज आणि सोप्या पद्धतीने आपला मोबाईल क्रमांक रेशन कार्ड शी लिंक करून त्यासंबंधी महत्वाचे अपडेट्स घरबसल्या आपल्या मोबाईल वर मिळवू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा