थोर सामाजिक कार्यकर्त्या शिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यातील एका हॉस्पिटल मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शिंधुताई सपकाळ यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर साता समुद्रापार आपल्या देशाचे  नाव उंचावले आहे.

अनेक अनाथ मुलांची माई म्हणून त्या ओळखल्या जात असत. अनेक अनाथ मुलांसाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. त्यांच्या या मेहनतीला आणि प्रशंसा जनक कार्यास सलाम.

Post a Comment