डी व्ही इ टी अर्थात व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय च्या अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयांतर्गत शिक्षकीय संवर्गातील पदांसाठी ७०० पदांसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

कौशल्य, विकास, रोजगार, आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर,पुणे, औरंगाबाद, येथील एकुण ७०० पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयांतर्गत एकूण नियमित ७ हजार ३९६ शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यांपैकी २३६३ पदे रिक्त असून कंत्राटी पदातील एकूण पदांपैकी १९०१पदे रिक्त आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यास क्रमांची पदे भरण्याकरता संबंधित अभ्यासक्रमाची यंत्रसामग्री स्किल गॅप च्या धोरणानुसार पदांच्या आवश्यकता लक्षात घेऊन सरळ सेवा कोट्यातील एकूण १२०३ पदे भरण्यासाठी प्रस्ताव मांडला गेला होता.

त्यातील शिक्षकीय कोट्यातील ७००पदांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्या चे शासन नियुक्त उपसमितीने शासन निर्णयात सांगितले आहे.

संचालनालयातील प्रादेशिक कार्यालयानुसार मुंबईत१८७,नाशिकमध्ये १०१,पुणे १०८,औरंगाबाद १०७,नागपूर ११२,आणि अमरावती,८५अशी एकूण ७००पदे भरण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच अर्ज भरण्यास सुरवात झाल्यानंतर इच्छुक आणि केवळ पात्र उमेदवारांनीच अर्ज सादर करावेत.

Post a Comment