25 जानेवारी पासून आणखी थंडी वाढण्याची शक्यता. सध्या हिवाळा ऋतू चालू असून  वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे थंडी कधी एकदम कमी तर कधी एकदम जास्त होत आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे  राज्यात थंडीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.वातावरणातील बदलामुळे


कोकणात ठराविक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.25 जानेवारी पासून थंडी वाढण्याची शक्यता आहे असे मत हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

अफगाणिस्तानातून येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडी पसरली असूनत्यामुळे ईशान्येकडुन येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान स्वच्छ आणि निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशात वाढ होऊन तापमानात घट झाली आहे.मात्र कोकणात 22 ते 24 जानेवारी रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने आप आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Post a Comment