दरवर्षी अनेक छोटे मोठे सण आणि उत्सव आपण साजरे करत असतो.आणि प्रत्येक सण आणि उत्सव यांचे वेगवेगळे महत्त्व असते. आणि त्या सणांपैकीच एक म्हणजे भोगी म्हणजे जो इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांतच्या एक दिवस अगोदर साजरा केला जाणारा दिवस होय.या दिवसाला भारतीय संस्कृतीत फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
भोगी याचा सरळ अर्थ असा आहे की भोग घेणारा किंवा उपभोग घेणारा.
यादिवशी संपुर्ण देशभर विशेषतः खेड्यापाड्यात घराशेजारील आजूबाजू चा परिसर स्वच्छ करून सडासमार्जन करून रांगोळी वगैरे काढली जाते. या दिवशी सकाळी घरातील सर्वजण लहान मोठ्या सहित लवकर स्नान करून स्वच्छ किंवा नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ देखील टाकले जातात. कारण यामुळे येणारा उन्हाळा ऋतु जास्त हानिकारक ठरत नाही, असे म्हंटले जाते.
असे आहे भोगी सणाचे विशेष महत्त्व:
इंग्रजी वर्षातला पहिला महिना जानेवारी आणि या पहिल्या महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे भोगी. या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे या दिवशी केली जाणारी भाजी. कारण जानेवारी म्हणजे थंडीचा महिना आणि नेमक या महिन्यात अनेक पिकांना आणि फळांना बहर आलेला असतो.जसे की हरभरा, ज्वारी, बोरे, ऊस, त्यामुळे या दिवशीच्या भाजीत देखील अनेक घटकांचा समावेश केला जातो.
जसे की हरभरा, वांगी, चवळी, गाजर, कांद्याची पात, फ्लावर, तसेच शेंगदाणे देखील इत्यादी. त्यामुळे ही भाजी वर्षातील सर्व भाज्यांपैकी वेगळी आणि विशेष असते.तसेच या दिवशी केल्या जाणाऱ्या भाकरी देखील खूप वेगळ्या असतात. करण या भाकरीमध्ये तीळ/काही ठिकाणी तिळलाच हाऊरी देखील म्हंटले जाते.
ती टाकली जाते. तसेच सोबतीला चवदार लोणचे, वांग्याचे भरीत, आणि बरेच काही पदार्थ बनवले जातात. या भाजी बनवण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा बदल असू शकतो.
हा सण संपुर्ण भारतभर साजरा केला जात असल्यामुळे ज्या त्या ठिकाणी तो विविध नावाने ओळखला जातो.
जसे की राजस्थानमध्ये "उत्तरावन" तर पंजाबमध्ये " लोहिरी" आसाममध्ये "भोगली बहू" तर हाच सण तामिळनाडू मध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत "पोंगल" नावाने साजरा केला जातो.
टिप्पणी पोस्ट करा