झोप नको असे म्हणणारे फार कमी असतात. काही तर मिळेल त्या वेळी झोपण्याच्या तयारीत असतात. मात्र चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम जितका महत्वाचा असतो तितकीच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. 

मात्र विविध प्रकारच्या कारणामुळे तसेच कामकाजामुळे माणूस दिवसभर थकून जातो आणि झोपताना मात्र कसे झोपावे ? कोणत्या दिशेला डोके करून झोपावे ?  या सामान्य गोष्टींकडे फारसे  लक्ष देत नाही.

दिवसभर दमून आल्यानंतर माणूस जेवण केल की  झोपण्याच्या तयारीत असतो, मात्र यावेळी तो अजिबात विचार करत नाही की आपण कसे झोपतो किंवा ज्या दिशेला डोके करून झोपतो खरच ती दिशा आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का ? याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ? तर जाणून घेऊ की कोणत्या दिशेला डोके करून झोपल्याने काय फायदा होतो.

● दक्षिणेकडे डोके करून झोपणे●

दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने केवळ आपले आरोग्यच चांगले राहत नाही तर आपण इतर आजारांपासून देखिल दूर राहू शकतो.

शोध कार्यातुन असे आढळून आले आहे की दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यास डोक्यातून चुंबकीय प्रवाह येऊन तो पायांत प्रवेश करतो.आणि त्यामुळे मानसिक ताण वाढून सकाळी अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे दक्षिणेकडे पाय न करता डोके ठेऊन झोपावे.

● पूर्व दिशेकडे डोके ठेवून झोपणे ●

दक्षिण दिशेप्रमाणेच झोपण्यासाठी पूर्व दिशा देखिल योग्य मानली जाते. पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय करून झोपल्यास अनेक फायदे देखील आहेत.

कारण सूर्याची उगवती दिशा ही पूर्व असून हिंदू संस्कृतीमध्ये  सूर्याला एक देवता मानले जाते. त्यामुळे पूर्व दिशेला डोके करून झोपणे एकदम योग्य मानले जाते. कारण आपण यामुळे दीर्घायुषी देखील होऊ शकतो. मात्र पूर्वेकडे पाय करून झोपणे एकदम अयोग्य मानले जाते.

● तसेच झोपेसंबंधी इतर काही महत्वाचे नियम ●

झोपेचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असल्यामुळे अधिक झोपणे, तसेच खूप कमी झोपणे हे देखील आपल्या  आरोग्यवर खूप परिणाम करत असते.

तसेच भारतीय शास्त्र आणि विविध पुराणांत देखील कसे व कोणत्या वेळी कसे व किती झोपावे या गोष्टीविषयी सांगितले आहे. 

जसे की,

● जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये.

सुर्य अस्थाच्या वेळी म्हणजे सूर्य मावळताना झोपू नये.

जेवणाच्या किमान तीन तासानंतर झोपावे. जेणेकरून पोटाच्या संबंधित असणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत.

महत्वाच्या कामाव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करते.

नेहमी सूर्य उगवण्याच्या अगोदरच उठले पाहिजे.

किमान ४ तास आणि कमाल ६ ते ८ तास झोप प्रौढ व्यक्तींसाठी आवश्यक असते.

लहान  बालकांना  त्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी ८ ते ९ तास झोपेची आवश्यकता असते.

रात्री झोपताना खूप वेळ एकाच अंगावर न झोपणे.

झोपताना पाठीवर तसेच डाव्या अंगावर झोपल्यास जास्त गाढ झोप लागते.

याप्रमाणे आपण झोपेचे काही निवडक पण अतिशय महत्वाचे नियम पाळले तर आपले आरोग्य तसेच एकूणच जीवनावर सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.




Post a Comment