भारतीय इतिहास आणि त्यात असे अनेक थोर महान सेनानी होऊन गेले ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन पणाला लावले.अनेकांनी आपले बलिदान देश स्वतंत्र करण्यासाठी त्यागले त्यातीलच एक स्वतंत्र सेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.
23 जानेवारी 1887 रोजी कटक मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला होता.लहानपणीच नेताजी बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना एकूण 8 भावंडे होती व नेताजी 9 वे. शालेय जीवनातच नेताजींना राष्ट्रप्रेमाचे धडे मिळू लागले होते.
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी नेताजींनी हिमालायकडे प्रस्थान केले होते. मात्र त्यांना गुरू मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचन करून त्यांनाच आपले गुरू मानले.
1921 मध्ये त्यांनी इंग्लंड ला जाऊन इंडियन सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होऊन 4 था क्रमांक पटकावला.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा इरादा करून त्यांनी इंडियन सिव्हील सर्व्हिस मधील चांगल्या पगाराच्या नौकरीला नकार देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.
त्यांना दोन वेळा काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर 1939 मध्ये त्यांनी आपल्या स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली.
21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर मध्ये अर्जी-हुकूमत-ए-हिंद या आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी दिलेला जय हिंद चा नारा आज भारताचा राष्ट्रीय प्रसिद्ध नारा बनला आहे.
द्वितीय महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेने जपानी सैन्याच्या मदतीने भारतावर आक्रमण करून इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतली.ही बेटे अर्जी-हुकूमत-ए हिंद सेनेच्या शासनाखाली राहून नेताजींनी त्यांचे शहीद व स्वराज असे नामकरण केले.
नेताजींचा गांधीजींच्या अहिंसा लढ्याला विरोध होता. कारण नेताजी असे म्हणत की रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे. मात्र नेताजी आणि गांधीजी यांत केवळ वैचारिक मतभेद होते. मात्र ते एकमेकांचे चांगले सहकारी होते. गांधीजी नेताजींना देशभक्तांचा देशभक्त असे म्हणत असत.
18 ऑगस्ट 1945 मध्ये विमानातून प्रवास करताना मांचुरीयकडे जाताना विमानाला अपघात होऊन ते बेपत्ता झाले ते कायमचेच त्या नंतर ते कधीही कोणालाही परत दिसले नाहीत.
नेताजींचा मृत्यू हा एक न उलगडलेलं कोड असून आजपर्यंत याचा उलगडा झाला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला पण शरीराचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत त्यामुळे त्यांचा मृत्यू हे एक ना उलगडलेले रहस्य/कोडेच आहे.
1992 साली नेताजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मृत्यू चा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला पुरस्कार त्यांच्या घरच्यांनी नाकारला.
भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना होती की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भातरत्न देऊन देखील हा पुरस्कार नाकारण्यात आला होता.
टिप्पणी पोस्ट करा