सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की लॉक डाउन कधी होणार ?
मात्र तूर्तास लॉक डाउन होणार नसून कडक निर्बंध मात्र नक्कीच घातले जातील.या निर्बंधा संबंधित नवी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
अशी असू शकते कडक निर्बंधांची नवी नियमावली.
गर्दीची ठिकाणे जसे की, हॉटेल्स,
पर्यटन स्थळे, चित्रपट गृहे, इत्यादी ठिकाणी वेळा ठरवून दिल्या जाऊ शकतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क आवश्यक आहे. विनाकारण गर्दी टाळणे, विनाकारण फिरणाऱ्यांना कडक कारवाई करून दंड देखील वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे विनाकारण फिरू नये.
टिप्पणी पोस्ट करा