गेली दोन वर्षे चोहीकडे कोरोनाचा कहर असून त्याने सामान्य जनतेपासून ते सर्व कलाकार तसेच राजकीय मंडळींची चांगलीच झोप उडवली आहे .या कोरोनाच्या सपाट्यापासून कोणीही वाचू शकलेला नाही. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ,सर्वांना २०१५ साली आलेला "बाहुबली" सिनेमा आठवतच असेल, आणि त्यातीलच एक मुख्य पात्र म्हणजे "कटप्पा"म्हणजेच साऊथ फिल्म जगतातील सुप्रसिद्ध अभिनेते सत्याराज यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना विलीगिकरणात ठेऊन ७ जानेवारी रोजी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अद्याप ते रुग्णालयात उपचार घेत असून मात्र त्यांच्या प्रकृती संबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सत्याराज यांनी १९७८ मध्ये आपल्या फिल्मी प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक साऊथ चित्रपटांत काम केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा